50+उत्कृष्ट नवरीसाठी मराठी उखाणे Marathi ukhane fo Female

या लेखात आपण उत्कृष्ट नवरीसाठी उखाणे Marathi ukhane fo Female हा लेख पाहणार आहोत. चलातर मग सुरुवात करूया. उखाणे मराठी

Marathi ukhane fo Female

उत्कृष्ट नवरीसाठी उखाणे Marathi ukhane fo Female

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

Marathi ukhane fo Female

मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची मी सून

Marathi ukhane fo Female

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

Marathi ukhane fo Female

नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
…. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी

Marathi ukhane fo Female

सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

Marathi ukhane fo Female

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

Marathi ukhane fo Female

सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,
…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

Marathi ukhane fo Female

गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती

Marathi ukhane fo Female\

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

Marathi ukhane fo Female

माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी

Marathi ukhane fo Female

लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
आणि …. रावांच्या घशात अडकला घास

Marathi ukhane fo Female

लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

Marathi ukhane fo Female

बारिक मणी घरभर पसरले,
….. रावांसाठी माहेर विसरले

Marathi ukhane fo Female

चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

Marathi ukhane fo Female

एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती

Marathi ukhane fo Female

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

Marathi ukhane fo Female

गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले

Marathi ukhane fo Female

पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
….. रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

Marathi ukhane fo Female

मगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,
….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

Marathi ukhane fo Female

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

Marathi ukhane fo Female

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
….. रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल

Marathi ukhane fo Female

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
…..रावांचे नाव घेते …..च्या दिवशी

Marathi ukhane fo Female

मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम,
….. रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम

Marathi ukhane fo Female

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी

Marathi ukhane fo Female

female marathi ukhane मराठी उखाणे

रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास

Marathi ukhane fo Female

तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

Marathi ukhane fo Female

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
—— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

Marathi ukhane fo Female

एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
—— रावांची सारी माणसे मी आपली मानली

Marathi ukhane fo Female

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
—— रावांचे नाव घेते —— ची सून

Marathi ukhane fo Female

काढ्यात काढा पाटणकर काढा,
—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

Marathi ukhane fo Female

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना

Marathi ukhane fo Female

सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

Marathi ukhane fo Female

Ukhane Marathi for wedding

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
—– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश

Marathi ukhane fo Female

अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले ——- रावांची सौभाग्यवती

Marathi ukhane fo Female

झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
—– राव सुखी रावो हीच आस मनाची

Marathi ukhane fo Female

सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
—— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात

Marathi ukhane fo Female

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
—— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद

Marathi ukhane fo Female

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
—— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

Marathi ukhane fo Female

सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
—— रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

Marathi ukhane fo Female

प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
—— रावांचे नाव घेऊन सोडले काकण

Marathi ukhane fo Female

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
——रावांना भरविते जिलेबिचा घास

Marathi ukhane fo Female

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
—— रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

Marathi ukhane fo Female

इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
—— रावांचे नाव घेते—— ची मी सुन

Marathi ukhane fo Female

सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
——रावांचे नाव घेते ऐका सारेजण

Marathi ukhane fo Female

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
——रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात

Marathi ukhane fo Female

मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
——रावांचा संसार हा सुखाचा कळस

Marathi ukhane fo Female

आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
—— रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल

Marathi ukhane fo Female

मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,
——राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी

Marathi ukhane fo Female

मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून,
—- राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून

Marathi ukhane fo Female

ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,
….. राव आणि माझी जोडी ठेव सुखात

Marathi ukhane fo Female

वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,
….. रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा

Marathi ukhane fo Female

शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले,
….. रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले

Marathi ukhane fo Female

विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,
….. रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष

Marathi ukhane fo Female

शंकरासारखा पिता, अन गिरिजॆसारखी माता,
….. रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता

Marathi ukhane fo Female

जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,
….. रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा

Marathi ukhane fo Female

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी

Marathi ukhane fo Female

सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,
….. रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान

Marathi ukhane fo Female

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
….. रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती

Marathi ukhane fo Female

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,
….. रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब

Marathi ukhane fo Female

भोळ्या शंकराला बेलाची आवड,
….. रावांची पती म्हणून केली मी निवड

Marathi ukhane fo Female

रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा,
….. रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा

Marathi ukhane fo Female

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
…. रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास

Marathi ukhane fo Female

एक तीळ सातजण खाई,
…. रावांना जन्म देणारी धन्य ती आई’

Marathi ukhane fo Female

तर मित्रांनो तुम्हाला उत्कृष्ट नवरीसाठी उखाणे Marathi ukhane fo Female लेख कसा वाटला आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. आणि हा लेख तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की share करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. धन्यवाद

1 thought on “50+उत्कृष्ट नवरीसाठी मराठी उखाणे Marathi ukhane fo Female”

  1. Букмекерская контора 1xBet является очень популярных на рынке. 1xbet мобильная версия Огромный выбор событий из мира спорта и киберспорта, десятки открытых линий, высочайшие коэффициенты. Также, БК имеет широкий функционал и одна из немногих дает возможность совершать ставки по уникальным промокодам. Используя их, вы можете получить реальный денежный выигрыш, не внося абсолютно никаких средств. Фантастика? – Нет, Реальность Узнать последний промокод вы можете прямо сейчас, однако использовать его необходимо в соответствии с правилами и инструкциями, которые приведены ниже.

Leave a Comment

लगेच व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा