IND vs AUS 1st Test: नागपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा १३२ धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 91 धावांवर आटोपला. यावेळी अश्विनने एकूण पाच बळी घेतले, तर जडेजा आणि शमीने 2-2 बळी घेतले. तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माचे शतक आणि जडेजा आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 400 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियावर 223 धावांची आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया 177 धावांवर आटोपला होता.
