20+नवरदेवसाठी मराठीत उखाणे Navardevache Ukhane marathi

या लेखात आपण नवरदेवसाठी मराठीत उखाणे Navardevache Ukhane marathi हा लेख पाहणार आहोत. चलातर मग सुरुवात करूया.

Marathi Ukhane for Male

नवरदेवसाठी मराठीत उखाणे Navardevache Ukhane marathi

  • हातात हात घेऊन सप्तपदी चालतो,
    शतजन्माचे नाते …. सोबत जोडतो.
  • असावी नेहमी हसतमुख बोलणे असावे गोड
    …. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.
  • सोन्याच्या कप आणि चांदीची बशी
    …. माझी आहे जणू उर्वशी.
  • दुधापासून बनते दही आणि तूप
    …. आवडते मला खूप खूप.
  • लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम
    …. ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
  • मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एसएमएस
    …. आज झाली माझी मिसेस
  • हातात आला हात बांधताना कांकन
    …. मुळे सुंदर झाले माझे जीवन.
  • लग्नाच्या स्टेशनवर सुरू आमचा जीवन प्रवास
    …. ला भरवतो गुलाबजामचा घास.
  • जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
    …. गळ्यात बांधतो मंगळसूत्र पती या नात्याने.
  • भल्या मोठ्या समुद्रात लहानशी होडी
    …. आणि माझी लाखात एक जोडी.
  • ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
    …. समोर सोनं पण लोखंड.
  • 2 अधिक 2 होतात चार
    …. सोबत करीन सुखी संस्कार.
  • पाहून तिला भागते माझी डोळ्यांची तहान
    …. माझी आहे रुपाची खाण.

navardevache ukhane | Navardevache ukhane marathi | मराठी उखाणे

  • नात्यांच्या रेशमी बंधात डाव नवा रंगतो
    …. ला आज मंगळसूत्र बांधतो
  • आजच दसरा आज दिवाळी
    …. आज माझ्या घरी आली.
  • रूप तिचे गोड नजर तिची पारखी
    शोधूनही सापडणार नाही …. सारखी.
  • समुद्राचे पाणी लागते खूप खारे
    …. साठी तोडून आणेल चंद्र आणि तारे
  • एसटी ला म्हणतात लोकं लालपरी
    …. आहे माझी सोनपरी.
  • सुंदर तिचे रुप छाप सोडते मनी
    …. आहे माझ्या स्वप्नांची राणी.
  • फोटो लावण्यासाठी बनवली चौकोनी फ्रेम
    माझ्या लाडक्या …. वर करतो मी खरे प्रेम.
  • सोपे व विनोदी उखाणे
    Navardevache ukhane marathi
    प्रेमाच्या ओलाव्याने दुःख कोरडी झाली
    …. माझ्या जीवनी चांदणे शिंपीत आली.
  • पाहताक्षणी चढली प्रेमाची धुंदी,
    …. मुळे झाले जीवन सुगंधी.
  • चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ
    …. च नाव घेतो पुढचे नाही पाठ.
  • गोड गोड पुरणपोळी वर घ्यावे भरपूर तूप
    …. वर माझे प्रेम आहे खूप खूप.
  • कावळा करतो काव काव चिमणी करते चिऊ चिऊ,
    …. नाव घेतो बंद करा तुमची टिव टिव.
  • शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,
    …. हात माझ्याच हाती.
  • एक होती चिऊ आणि एक होता काऊ
    …. चे नाव घेतोय डोकं नका खाऊ.
  • निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे,
    …. नाव घेतोय लक्ष द्या सारे.

तर मित्रांनो तुम्हाला नवरदेवसाठी मराठीत उखाणे Navardevache Ukhane marathi लेख कसा वाटला आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. आणि हा लेख तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की share करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. धन्यवाद

Leave a Comment

लगेच व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा